स्वरचित

“देणार्‍याने देत जावे

घेणार्‍याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे.”

विंदानी म्हटलय त्याच धर्तीवर पुढे सांगवेसे वाटतय की वाचणाऱ्याने एक दिवस लिहिण्याऱ्याचे हात घ्यावे.. म्हणजेच वाचकांनीही आता थोडा लिहिण्याचा प्रयत्न करावा. कदाचित तुमच्यापैकी बरेच जण लिहितही असावीत. तुमचं लिखाण प्रकाशित करायचं कुठे असा जर तुम्हाला संभ्रम असेल तर तो दूर करण्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी युएई समिती या लिहित्या हातांना आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देत आहे …ग्रंथ तुमच्या दारी युएईचे सर्व वयोगटातील वाचक आणि समन्वयक आपले मराठी भाषेतील साहित्य.. कथा, लघुकथा, अलक, कविता, ललित लेखन, प्रवास वर्णन, मनोगत इत्यादीग्रंथ तुमच्या दारीच्या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी आपापल्या समन्वयकांकडे पाठवू शकतात.

‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे ‘असे समर्थ रामदास सांगून गेले. या धकाधकीच्या आयुष्यात दिसामाजी नाही जमलं तरी कधीतरी लिहिण्याचा प्रयत्न करायला नक्कीच हरकत नाही.वाचनाचा आनंद आपण घेतच आहोत, पण त्या जोडीने लिहिण्याचा , स्वतः काहीतरी रचण्याचा आनंदही घेता आला तर? ते समाधान काहीतरी विलक्षणच असेल, नाही का? ‘ग्रंथ तुमच्या दारी’ सर्व समन्वयक आणि वाचकांना स्वतः लिहिलेलं साहित्य प्रकाशित करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे…ते म्हणजे एक नवीन उपक्रम.. ज्याच नाव आहे, स्वतः रचलेले म्हणजेच ✍🏻 *स्वरचित*✍🏻 !!

(सर्व वयोगटातील वाचकांनी आपले स्वतःचे लिखाण आपापल्या समन्वयकांना पाठवावे. लिखाणात काही बदल वा सुधारणा हवी असल्यास तसे सुचवले जाईल. प्रकाशनाचे पूर्ण अधिकार ग्रंथ तुमच्या दारी, युएई समितीकडे असतील. )

श्वेता पोरवाल

ग्रंथ तुमच्या दारी युएई समिती समन्वयिका