परदेशातील उच्च-शिक्षण या विषयावर लेखमाला

नमस्कार,


“ग्रंथ तुमच्या दारी” युएई समितीचे समन्वयक श्री. प्रथमेश आडविलकर यांचे परदेशातील उच्चशिक्षणाच्या संदर्भातील काम पाहून आपल्या ग्रंथ परिवाराला त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळावा या हेतूने त्यांची या विषयावर एक लेखमाला, “ग्रंथ वाचक कट्टा” या ग्रंथ तुमच्या दारी युएईच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर प्रकाशित केली गेली. साधारण आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ही लेखमाला निश्चितपणे उपयोगी ठरेल. म्हणूनच ती आमच्या ब्लॉगवर पुन्हा प्रकाशित करत आहोत.


📍श्री प्रथमेश आडविलकर युएई मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये कार्यरत.
📍२०१३-२०१९ लोकसत्ताच्या ‘ करिअर वृत्तान्त ‘ पुरवणीत लेखन.
📍परदेशातील विविध शिष्यवृत्तींवर “देशोदेशींच्या शिष्यवृत्ती”, भारतातील राष्ट्रीय संशोधन संस्थांवर “संशोधन संस्थायन “आणि पुन्हा परदेशातील अग्रगण्य विद्यापीठांवर “विद्यापीठ विश्व” या तीन सदरांच्या माध्यमातून लोकसत्तामध्ये लेखन.
📍”परदेशातील उच्चशिक्षण” या विषयावर दैनिक सकाळमध्ये २०१९ साली लेखन.
📍”लोकसत्ता-मार्ग यशाचा ” या कार्यशाळांमध्ये “परदेशातील शिक्षणसंधी ” या विषयावर व्याख्यान व करिअर समुपदेशन.

लेखमाला वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

परदेशातील उच्चशिक्षण लेखमाला – प्रस्तावना