पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ६७


परीक्षण क्रमांक : ६७

दिनांक: ३१ जुलै २०२३

पुस्तकाचे नाव: चतुर्भुज

लेखक: व. पु. काळे

ग्रंथपेटी क्रमांक: २५

पुस्तक क्रमांक: ६०६

परीचयकर्ती आणि समन्वयिका: पल्लवी कबाडे, अबूधाबी

व. पु .काळे लिखित चतुर्भुज हा एक कथासंग्रह आहे. तप्तपदी, झपूर्झा, पार्टनर यासारखी त्यांची अनेक पुस्तके वाचनात आली. प्रत्येक पुस्तकात त्यांची वेगळी लेखन शैली आपल्याला दिसते.या संग्रहामधे एकूण 15 वेगवेगळ्या कथांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक कथा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेल्या घटनेवर आधारित आहे व नकळत आपल्याला आपल्या भूतकाळात नेऊन त्या गोष्टीची आठवण करून देणारी आहे.

*बलिदान* मधील नियतीच्या फेऱ्यात अडकलेली बायको.*माणसाला केवढ्या जागेची गरज आहे*. या कथेतून माणसाची सुख शोधण्याच्या नादात चाललेली जीवाची ओढाताण. आणि एवढी ओढाताण करत असताना हाती आलेली निराशा आपल्याला निशब्द करून जाते .*चुडा* या कथेतील वर पक्षाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात वधु पक्षाची झालेली केविलवाणी दैना. वडिलांची व आईची वर पक्ष्याला समजावताना होत असलेली तारेवरची कसरत ती वधु फक्त शांततेने बघत असते. तर या उलट *लावी पक्षिणीची गोष्ट*यातला शेवट नकळत चेऱ्यावर एक स्मित हसू देऊन जाते. *उलगडा* या कथेतील नंदा आणि तिच्या गुरुजींना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळतात तेव्हा खरच जाणवतं की एकमेकांशी बोलून प्रश्न सुटणार असतील तर का आपण मनातच सगळ्या प्रश्नाचा गुंता सोडवत बसतो?

व. पु. च हे पुस्तक आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तर देऊन जाते. जर हे पुस्तक हाती पडलच तर नक्कीच वाचा.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment