पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ३३

परीक्षण क्रमांक: ३३

दिनांक: २मे २०२३

पुस्तकाचे नाव: वपूर्झा

लेखक: व. पु. काळे

ग्रंथपेटी क्रमांक:

पुस्तक क्रमांक:

समन्वयक आणि परीचयकर्ता: श्री कुलकर्णी, मनखुल

वसंत पुरुषोत्तम काळे, वपु या नावाने ओळखले जाणारे, मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक.१९६० साली नोव्हेंबर महिन्यात वपुं चा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर सुमारे चाळीस वर्षाच्या कालावधीत त्यांची साठापेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली. यात कथासंग्रह, कादंबरी, नाटक, व्यक्तिचित्र ,नभोनाट्य, आठवणी, ललित लेख आणि त्याशिवाय कथाकथन असा त्यांचा लेखन आणि कथनाचा तीन तपांचा प्रवास आहे. पण वपुंचे वपूर्झा हे पुस्तक वरीलपैकी कुठल्याच प्रकारात मोडणारे नाही.हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अनेक कथांमधील पात्रांच्या जीवनातील विविध प्रसंग, समस्या, नात्यातील गुंतागुंती यावरील त्यांचे कथेतील भाष्य किंवा विचारांचा संग्रह आहे.वपुंच्या कथा म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाच्या कथा. त्यातील मध्यमवर्गीय पात्रे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात. त्यांच्या समस्या, नात्यांची गुंतागुंत सगळे आपल्यासारखेच असते पण जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यावर वपुंचे भाष्य कधी खुसखुशीत तर कधी त्या समस्येचा , वागण्याचा किंवा नात्याचा वेगळ्याच पैलू ने विचार करायला लावणारे असते. हे विचार कधी प्रेरणा देतात तर कधी हळुवार फुंकर घालतात.  

त्यांच्याच शब्दात :हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी! हे पुस्तक कसे वाचायचे? एका बैठकीत? छे! मुळीच नाही. हवे ते पान आपापल्या  मूडनुसार उघडायचे आणि त्या सुगंधाने भारून जायचे. त्यासाठी अशा शेकडो अत्तराच्या कुप्या पानापानात आहेतमन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन.आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच आपण सुखी होतो.

जीवनात पडणारे काही प्रश्न सोडवायला बसलो म्हणून सुटत नाहीत तर असे काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात.असे सुगंध पुन्हा पुन्हा घ्यावेसे वाटणारच. मग पुन्हा शोधायचे. त्या शोधात आणखी काहीतरी सापडणारच. 

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment