हाच माझा मार्ग – सचिन पिळगावकर

59c1de77da0842829ee84b115c189e4dहाच माझा मार्ग – आत्मकथन
सचिन पिळगावकर
शब्दांकन – अभिजीत पेंढारकर
मेहता पब्लिशिंग
सचिन पिळगावकर यांचे हे आत्मकथन. फिल्म इंडस्ट्री मधील ‘मोठे’ नाव. शब्दांकन अभिजीत पेंढारकर यांचे. मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन.
३१२ पानाचे हे जाडजूड पुस्तक. परंतु अर्ध्याहून अधिक पानावर छायाचित्र आहेत.
सचिन चे ‘शिष्य’ चाहते, ज्यांना सचिन ने सर्वप्रथम ब्रेक दिला ते प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची ‘मेरे सचिन भैय्या’ म्हणुन याला प्रस्तावना लिहिली आहे. १९६३ साली वयाच्या अवघ्या साडे चार वर्षाच्या सचिन ने बालकलाकार म्हणुन काम केले अणि त्या नंतर करतच राहिले. ५० वर्षाहून अधिक काळ ते या इंडस्ट्री मध्ये वेगवेगळया भूमिकेत आहेत.
या पुस्तकातील कथन एकूण ७० भागात आहे. त्याला सीन १,सीन२.. असे नंबर आहेत. सीन १ म्हणजे माझी नाट्यमय ‘एंट्री’ पासून शेवटचा सीन ७० ‘कृतज्ञ’ हा आहे. हे आत्मकथन असले तरी यातील सगळी पात्रे आपल्या परिचयाची आहे. सचिन येवढेच या इंडस्ट्री विषयी वाचायला आपल्याला नेहमीच आवडते. बहुतेक सगळी पात्र फिल्म इंडस्ट्रीशी जुळलेली आहेत. मराठी पेक्षा अधिक काम त्यांनी हिंदी मध्ये केले आहे. हा चॉकलेट हीरो नेहमीच आवडीचा होता आणि राहील.
सचिन ने ‘राज कपूर’ व्हावे असे त्यांचे वडील  शरद पिळगावकर यांना वाटायचे. त्या करता तसे बाळकडू त्यांच्या वडीलांनी त्यांना दिले. इंडस्ट्री ची ओळख करून दिली.
हे आत्मकथन वाचताना आपल्या आवडत्या अनेक हीरो, हीरोइन, दिग्दर्शक, कॅमेरामन 📹, मेकअप आर्टिस्ट, संगीतकार, गायक, तंत्रज्ञान, याबद्दल अनेक किस्से वाचायला मिळतात. त्या सर्वांचे सचिनजी सोबत असणारे भावनिक, प्रोफेशनल संबंध, त्या निमित्ताने घडलेल्या गमती जमती तर काही कटू अनुभव यात आहेत. मीना आप्पा (मीना कुमारी), युसूफ भाई (दिलीप कुमार), हरी भाई (संजीव कुमार), अमित जी, दादा मुनि (अशोक कुमार) या व अनेक  कलाकारांसोबत ऋषीदा, पंचम दा, किशोर दा, आशा ताई, दीदी, सुलोचना बाई, महेश कोठारे, अशोक सराफ – निवेदिता, लक्षा, माधुरी, नवीन जुन्या हीरो, हिरोइन सार्‍यांची उजळणी त्या निमित्ताने होते. सचिन – सारिका /सचिन – रंजीता या त्या काळी गाजलेल्या जोड्या. सचिनची जोडी खूप हिट  झाली ती त्यांची ‘नवरी’ सुप्रिया सोबत. या जोडीचा ‘सुखाचा संसार’ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आदराने उल्लेखला जातो. त्यांची ‘एकुलती एक’ श्रीया हिच्यावर अर्थातच स्वतंत्र ‘सीन’ आहे.
बालकलाकार म्हणुन सुरवात करून अभिनेता(पारध – १९७७), दिग्दर्शक (मायबाप – १९८२), लेखक (माझा पती करोडपती – १९८८), निर्माता ( आयत्या घरात नागोबा – १९९१), गायक अशा विविध  क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे.
४२ मराठी सिनेमे, ३ मराठी नाटके( अपराध मीच केला, म्हैस येता माझ्या घरा, शिकार) , हिंदी, गुजराती, इंग्रजी एकूण ८९ चित्रपट, TV मालिका, Reality Shows, Host, सचिनमय अल्बम अशा अनेक बाबीत त्यांचे अमूल्य योगदान आहे.
नच बलिऐं – सीजन १ चे विजेता म्हणुन त्यांची व सुप्रियाची जोडी सर्वांच्या नेहमी लक्षात राहील. ५० वर्षाहून अधिक काळ इंडस्ट्री मध्ये काम केल्यावर Star या Rockstar या reality show मध्ये गायक म्हणून सहभाग  घेणे कौतुकास्पद आहे.
‘तू तू मैं मैं’ ही अतिशय गाजलेली रिमा अणि सुप्रियाची मालिका. या मालिकेने त्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. याची कबुली ते स्वतः देतात. १९९५ मध्ये परत एकदा मी Income Tax भरण्याच्या टप्प्या पर्यंत गेलो असे ते म्हणतात.
Sachin, you are an Asset to Film Industry अशी ऋषीदां कडून त्यांना मिळालेली शाबासकी बरेच काही बोलून जाते.
महागुरु ही स्वतःला एका अर्थी त्यांनी दिलेली पदवी हा प्रवास वाचता योग्य वाटते.
सचिन महाराष्ट्रचे भूषण नक्कीच आहे. त्यांचा दांडगा उत्साह, सतत शिकण्याची धडपड, कलेला वाहिलेले, नवीन काही देण्याचे सतत प्रयत्न करणारे सचिन पिळगावकर महाराष्ट्रचे भूषण नक्कीच आहे.  ‘हाच माझा मार्ग’ योग्य शीर्षक आहे. 910_bc
त्यांच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा 💐
ग्रंथपेटी वाचक
स्मिता देशपांडे
शारजाह, UAE
11/3/2020

This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment