पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ४३

परीक्षण क्रमांक : ४३

दिनांक: १ जून २०२३

पुस्तकाचे नाव: वपु यांची माणसं

लेखिका : व.पु. काळे

ग्रंथपेटी क्रमांक:

पुस्तक क्रमांक: १०२

परीचयकर्ती: सौ. आरती अडके

समन्वयिका: सौ. आरती अडके, शारजाह

लेखक, कथाकथनकार, आर्किटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर, सुंदर हस्ताक्षर, आणि सुंदरतेचे वेड असणारे, सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणार्‍या माणसांचे चाहते, व. पू. काळे यांचे हे पुस्तक ‘ माणसं, माणसं, माणसं व. पू. यांची माणसं.’या पुस्तकातही व. पू माणसांन विषयी लिहतात. त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक माणसे भेटली, त्या माणसांच्या चांगल्या आणि त्यानां भावलेल्या गुणांविषयी त्यांनी या पुस्तकात लिहले आहे. वपुना अनेक मांणसे वास्तवात भेटली. त्या पैकी काही नावाजलेल्या , प्रसिद्ध व्यक्ती डॉ. जयंत नारळीकर, आचार्य अत्रे, सुधीर फडके यांसारखी ज्ञानभाराने वाकलेली माणसेही होती.

तसेच, सामान्य जनमानसातील उत्साहाने सळसळणारी, दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणारी शुभा त्यांना भेटली. लोण्यासारखा मृदु स्वभाव असलेला माणूस बंडोपंत गानू आणि त्याच्या माणुसकीचा, नम्रतेचा, सौजन्याचा, कर्तुत्वाचा वारसा जपणारा त्यांचा मुलगा प्रकाश याचे कौतुक करताना त्याच्या जवळ शब्द कमी पडतात. श्री केळकर, एक उसळत कारंज, वृत्तीने हळवा, बोलताना भावूक, वत्सल कुटुंबप्रमुख आणि चांगल्या साहित्याचा भोक्ता पण व्यवसायाने वकील!! अशी अपवादात्मक लोक सुद्धा वपुना ना त्यांच्या आयुष्यात भेटली.

फक्त भारतातच नाही तर, दुबई मध्ये भेटलेले चैतन्य गदेॅ आणि उदय चिपलकट्टी, अगत्याने आणि प्रेमाने पाहुणचार करणारे त्यांचे कुटुंबीय अशा एक ना अनेक मांणसानं विषयी आणि त्यांच्यातील चांगल्या गुणांविषयी व. पू. काळे यांनी या पुस्तकात भरभरून लिहिले आहे.

कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांच मिश्रण म्हणजे ” माणूस”. अशा मांणसातील माणूस वाचण्यासाठी आणि मांणसामधील सकारात्मकता शोधण्यासाठी हे पुस्तक सर्वानी नक्की वाचवे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a comment