पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ३१

परीक्षण क्रमांक : ३१

दिनांक: २६ एप्रिल २०२३

पुस्तकाचे नाव: चेटूक

लेखक : विश्राम गुप्ते

ग्रंथपेटी क्रमांक: १६

पुस्तक क्रमांक: ३९२

परिचयकर्ती : सौ. संस्कृती संतोष मालप

समन्वयक: प्रथमेश आडविलकर

लेखक श्री. विश्राम गुप्ते यांनी लिहिलेले “चेटुक”हे पुस्तक स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळातील अमृतराव दिघे यांच्या कुटुंबावर आधारित आहे. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर समाजात आणि माणसा माणसांमध्ये अनेक बदल झाले. त्यापैकी एक म्हणजे सिनेमाचं वेड. मात्र त्या काळातील तरुणपिढीवर या सिनेमाच्या प्रेमामुळे एक वेगळाच परिणाम झाला. प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रेमाची भावना पूर्वी पासून होतीच, पण सिनेमामुळे ही प्रेमाची भावना जागृत होऊ लागली.

या पुस्तकामधे असलेल्या पात्रांपैकी वसंत आणि राणी ही एकमेकांच्या प्रेमामध्ये लीन असलेली दोन प्रमुख पात्रे दाखवण्यात आलेली आहेत. वसंताच्या प्रेमात वेडी झालेली राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते मात्र लग्नानंतर काही दिवसातच तिला नवऱ्याचे प्रेम आटून गेल्यासारखे वाटते. तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटते, नवऱ्याचे प्रेम सुटल्यासारखे वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलविणाराच तिला नकोसा वाटू लागतो.

हळवा, प्रेमळ आणि मृदू असलेला कवी मनाचा वसंत आणि त्याच्या अगदिच उलटी वाटावी अशी उत्साही,तडफदार,निडर आणि महत्वाकांशी असलेली राणी, वसंताला नेहमी ‘ विज ‘ वाटायची. या दोघांचे एकमेकांवर असलेले अतोनात प्रेम याचीच कहाणी म्हणजे चेटुक. हे पुस्तक प्रेमाची एक वेगळी कथा समजून घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून वाचावे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment