पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ६६

इमेज कर्टसी : इंटरनेट

परीक्षण क्रमांक : ६६

दिनांक: २९ जुलै २०२३

पुस्तकाचे नाव: नियती

लेखिका: डॉ. उषा खंदारे

ग्रंथपेटी क्रमांक: २२

पुस्तक क्रमांक: ५४५

परिचयकर्ती : पौर्णिमा जोशी

समन्वयिका: विशाखा पंडित , डिस्कवरी गार्डन्स.

हा यांचा अठरा ललित लेखांचा संग्रह आहे. या बद्दल असं म्हणता येईल की, सहज आणि सोप्या भाषेत लिहिलेले आयुष्यातील काही अनुभव आणि त्यामुळे सुरु झालेली चिंतन प्रक्रिया यातून त्यांनी आपल्या विचारांचा खजिनाच वाचकां समोर ठेवला आहे.


नियती या लेखा मध्ये त्यांनी आपल्या एका जवळच्या मैत्रिणीचा अनुभव लिहिला आहे. लग्नाआधी संवेदनशील असलेली त्यांची मैत्रिण लग्नानंतर मात्र पतीच्या संशयी, व्यसनी स्वभावा मुळे मनाने दगड बनली / चेतनाहीन बनली. असाच दुसरा अनुभव लिहिला आहे की ज्या मैत्रिणीला व्यसनी माणसांचा राग होता. तिला व्यसनी नवराच नाही तर सासरच व्यसनी मिळालं.असेच अजून काही अनुभव त्यानी लिहिले आहेत.


नवा साक्षात्कार या लेखात त्यांनी स्वानुभव लिहिला आहे. ज्या मुळे त्यांचा जीवना कडे बघण्याचा दृष्टिकोण आमूलाग्र बदलला. एका छोट्याशा अपघातानं त्याचा पाय तीन महिने प्लास्टर मध्ये ठेवावा लागला. पहिल्यांदा प्लास्टर मध्ये पाय बघितल्यावर अपंगत्वा ची आलेली भावना, त्याच बरोबर आई ,वडील मुलांना सांगतात की स्वःताच्या पायावर उभे रहा. यातील सर्वव्यापी पण पायांशी निगडित अर्थ त्यांच्या लक्षात आला, तो त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच दुखावल्या गेल्या मुळे आठवलेल्या पायां वरील म्हणी आणि वाक्प्रचार लिहिले आहेत. हे वाचून वाटल की मराठी मध्ये माणसाच्या सगळ्या अवयवांवर म्हणी असतील.(हात,कान,डोळे,नाक वगैरे) . सक्तीच्या या विश्रांती मध्ये विरांगुळा म्हणून खिडकीत बसल्या असताना हात-पाय नसल्येल्या रस्त्या वरच्या भिकऱ्यामुळे आत्मचिंतनची नवी दिशा मिळाली.


देवाच्या नावानं हा लेख वर्तमानपत्रा मधील बातम्यांच्या चिंतनातून लिहिला गेला आहे. यात त्यांनी भारतातील देवस्थान आणि त्यांच्याकडे जमा होणारी दान स्वरूपातील संपत्ती याबद्दल लिहिले आहे. काही देवस्थान याचा उपयोग समाज सुधारणेसाठी करतही असतील. पण विषमतेची ही दरी खूप मोठी आहे. ती कमी करण्याची इच्छाशक्ती ठेवायला हवी.


बांगड्या हा थोडा वेगळा लेख वाटला. त्यांनी लिहिलेला अनुभव दुःखद आहे.पण बांगड्या बद्दल ची माहिती अभ्यासपूर्ण आहे. निरोप हा लेख त्यांनी जीवनात येणाऱ्या निरोपाच्या प्रसंगांवर लिहिला आहे. नोकरीतून निवृत्त होताना चा निरोप, कॉलेज सोडताना चा निरोप, घर बदलताना चा निरोप,ते अगदी शेवचा जगाचा घेतलेला निरोप.


पुस्तक वाचत असताना असं जाणवत की हे तर आपले पण अनुभव आहेत. आपलाही कधी एखादा अवयव दुखावला होता तेव्हा शरीरातील सगळेच अवयव महत्वा चे आहेत हा साक्षात्कार आपल्याला देखील झाला होता. निरोप घेताना इतकाच म्हणेन की हे हलकं, फुलकं पुस्तक जरूर वाचा.




This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment