पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक २

दिनांक : २९ जानेवारी २०२३

परीक्षण क्रमांक:

पुस्तकाचे नाव: हस्ताचा पाऊस

लेखक- व्यंकटेश माडगूळकर

पुस्तक क्रमांक: १५६

पेटी क्रमांक : पेटी ७

परिचयकर्ता – नितीन उपाध्ये, अल बर्शा

समन्वयक: नितीन उपाध्ये, अल बर्शा

खर तर मी हे पुस्तक “माडगूळकर” हे आडनाव बघून वाचायला घेतले. कारण माझ्या मनात श्री. ग. दि. माडगूळकर होते. व्यंकटेश माडगूळकर हे त्यांचेच धाकटे बंधू आहेत, हे मला पुस्तक वाचल्यामुळे कळाले. या पुस्तकातल्या १२ कथा वाचण्यापेक्षा ही जास्त आनंद माडगूळकरांचे स्वगत “सुरुवातीच्या आठवणी” वाचण्यात आला . जेव्हा ते लिहतात “दादा गोष्टी सांगण्यात फार वाकबगार होते. गोष्टीची सुरुवात नेहमी निसर्गवर्णनाने होई” हे वाक्य आमच्या सारख्या नवलेखकांना फार उपयोगी सल्ला आहे. शेवटी ते जे लिहतात ते फार फार मोलाचे आहे जणू सारे गीता ज्ञान ह्या एका ओळीत लिहले गेले आहे,
“यश वाहून जाते, अपयश साचते”.

मला वाटते ज्या दिवशी हे आम्ही आत्मसात केले त्या दिवशी आमच्या जगण्याला वेगळे वळण लागेल. १२ कथा पैकी प्रत्येक कथा एका वेगळ्या विश्वात घेवून जाते. भाषा आणि पुष्कळ से शब्द मला ज़रा ओळखीचे नव्हते पण गूगल ज़िंदाबाद म्हणून कथा उमगली. ग्रामीण भाषेचा, ग्रामीण भागाचा आणि त्या साध्या भोळ्या भाबड्या मनांचा वेध घेत घेत केव्हा स्वतःचीच कथा वाटू लागते कळतच नाही. “विपरीत घडले नाही” मधल्या बहिणा आणि विट्ठल पोलिसाची” कथा मनाला हेलावून जाते. “हस्ताचा पाऊस” मधल्या दोन्ही गाढवांची कहाणी वाचताना प्रेमचंद च्या “दो बैल च्या हीरा मोतीची आठवण येते”. एका गाढ़वासारख्या प्राण्याचे ज्या बारकाईने वर्णन केले आहे ते फक्त एका उच्च कोटिच्या लेखकाचेच काम असू शकते. “असच” वाचताना ‘येसाची’ दीन अवस्था बघून मनात कुठे तरी चटका लागतो.
प्रत्येक गोष्टी मध्ये वातावरण, शहर किंवा गाव (जस रंकाळा तलाव) ही एका नायका सारखा दिमाखाने आपली ओळख करवत असतो, जर का नायकाच्या भोवताली हे वातावरण इतक्या भक्कमपणे उभारले गेले नसते तर कदाचित कहाणी मध्ये जीव नसता राहिला. ह्या कथा वाचूनच ह्यांचा अनुभव घेता येईल, म्हणून सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावं.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment