पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ४९

परीक्षण क्रमांक : ४९

दिनांक: १९ जून २०२३

पुस्तकाचे नाव: बंदा रुपया

लेखक : विश्वास पाटील

ग्रंथपेटी क्रमांक:

पुस्तक क्रमांक: २३

परीचयकर्ता : श्री संजय देशपांडे

समन्वयिका : सौ.स्नेहल देशपांडे, इंटरनॅशनल सिटी


बंदा रुपया हे श्री. विश्वास पाटील यांनी लिहिलेले पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. साहित्य,नाट्य, संगीत, इतिहास आणि सिनेमा या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिले गेले आहे. एखाद्या विषयाच्या खोलात जाऊन त्यातील सर्व बाबी समजून घेऊन त्या विषयाची योग्य तऱ्हने मांडणी केल्याने आपण नकळत त्या विषयात गुंतून जातो. त्यांच्या ह्या अभ्यासपूर्ण शैली मुळे आपण तो क्षण प्रत्यक्ष अनुभवल्याचा थरार जाणवल्या शिवाय राहत नाही.


छत्रपती संभाजी राजांबद्दल पसरलेले गैरसमज, त्यांचे जिवलग मित्र कवी कलश ह्यांना खलनायक ठरवण्याचा डाव आणि केवळ रंजक बनवण्यासाठी प्रस्तुत केलेली नाटके आणि कथा ह्या कशा बिनबुडाच्या आहेत, हे ठामपणे मांडण्यासाठी केलेला अभ्यापूर्वक प्रयत्न आपणास विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो.


महानायक कादंबरीनिमित्त त्यांनी केलेला प्रवास आणि सत्य पडताळून पाहण्याची जिद्द पुन्हा एकदा वाखाणण्याजोगी आहे. ह्या त्यांच्या सत्यशोधक वृत्तीमुळे आपल्याला नव्याने त्या व्यक्तीची ओळख होते .


विविध विषयांवर केलेली मुशाफिरी आपल्याला संमोहित करून टाकते. लावणी असो किंवा सिनेसृष्टीतील व्यक्ती असोत, आपल्याला त्यांची नवी ओळख होते. वास्तवाला धरून आणि कोणतेही अवडंबर न माजवता व्यक्ती ओळख करून देण्याची कला लेखकाला सहज जमते.


पानिपतची लढाई ही वीर योध्यांनी लढलेल्या युद्धात जरी मराठ्यांचा पराभव झाला तरी अब्दालीला जो विजय मिळाला होता तो सहजा सहजी मिळाला नव्हता. जिगरबाज मराठा तलवारीची त्याला इतकी दहशत बसली होती कि विजयी होऊन सुद्धा पुह्ना हिंदुस्तानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. ह्या सर्व घटनेमागची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासारखी आहे. प्रत्येक भारतीयाने ह्याबद्दलची माहिती घेणे आवश्यक आहे. आणि सुदैवाने मराठीत विश्वास पाटील यांच्या सारख्या लेखकांनी नक्कीच मोलाची कामगिरी केली आहे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a comment